पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, शासकीय तंत्रनिकेतन व जवाहर नवोदय विद्यालय या सात परीक्षा केंद्रांवर होत आहे. या सर्व परीक्षा केंद्रानावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही. परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील इंटरनेट, झेरॉक्स सेंटर, पानपट्टी सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परीक्षा कालावधीत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल, सेल्युलर फोन, लॅपटॉप, फॅक्स, वायरलेस सेट, रेडीओ व इतर प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे
Thursday, March 9, 2017
पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
Posted by vidarbha on 8:57:00 PM in वाशिम / महेंद्र महाजन - | Comments : 0
वाशिम / महेंद्र महाजन -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ दिनांक १२ मार्च २०१७ रोजी वाशिम शहरातील सात परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. एकूण २४७२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. सातही परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू नुसार प्रतीबंधातामिक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, शासकीय तंत्रनिकेतन व जवाहर नवोदय विद्यालय या सात परीक्षा केंद्रांवर होत आहे. या सर्व परीक्षा केंद्रानावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही. परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील इंटरनेट, झेरॉक्स सेंटर, पानपट्टी सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परीक्षा कालावधीत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल, सेल्युलर फोन, लॅपटॉप, फॅक्स, वायरलेस सेट, रेडीओ व इतर प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे
पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, शासकीय तंत्रनिकेतन व जवाहर नवोदय विद्यालय या सात परीक्षा केंद्रांवर होत आहे. या सर्व परीक्षा केंद्रानावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही. परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील इंटरनेट, झेरॉक्स सेंटर, पानपट्टी सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परीक्षा कालावधीत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल, सेल्युलर फोन, लॅपटॉप, फॅक्स, वायरलेस सेट, रेडीओ व इतर प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment