स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली असून विदर्भ राज्यासाठी येत्या 11 मार्चला यवतमाळ येथे भव्य शेतकरी मेळावा व 6 एप्रिल रोजी सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन होणार असल्याची माहिती पश्चिम विदर्भ सचिव पवन राऊत यांनी दिली. नागपूर येथे रविवार, 5 मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला अध्यक्षस्थानी माजी आमदार ऍड. आनंदराव वंजारी हे होते. मार्गदर्शक म्हणून राम नेवले, ऍड. वामनराव चटप यांनी उपस्थिती होती. तर बैठकीला प्रबिरकुमार चक्रवर्ती, धर्मराज रेवतकर, अरुण केदार, अमरावती विभाग उपाध्यक्ष सौरभ गंगावणे, सरचिटणीस निखिल गवळी, युवा जिल्हाध्यक्ष विनोद जऊळकर, श्री देशमुख आदींची उपस्थिती होती. बैठकीत कोर कमेटीच्या वतीने पुढे बोलतांना वामनराव चटप म्हणाले की, कॉग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवु शकले नाहीत. त्यांच्याच शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत. म्हणून त्यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षात असतांना देवंेंद्र ङ्गडणवीस यांनी केली होती. आता ङ्गडणवीस हे मुख्यमंंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावर 306 अंतर्गत शेतकर्यांच्या खुनाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठीचे आंदोलन अधिक तिव्र होणार असून त्याअंतर्गत 11 मार्चला यवतमाळ येथे भव्य शेतकरी मेळावा व 6 एप्रिल रोजी सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन होणार आहे. विदर्भस्तरीय कोर कमेटी पुनर्गठीत करण्यात आली असून संपूर्ण विदर्भभर जिल्हा, तालुका व गाव पातळीपर्यत समितीची संघटनात्मक बांधणी करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम विदर्भ सचिव पवन राऊत यांनी सदर बैठकीत दिली.
Post a Comment