BREAKING NEWS

Monday, April 3, 2017

युवा कोराना न्याय मिळेल का ? उपोषणाचा आज 5 वा दिवस ,डॉ दत्ता देशमुख चे युवाना फसविण्याचे षड्यंत्र

वाशिम / महेंद्र महाजन जैन -




वाशिम जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राच्या भ्रष्टचाराची चौकशी करून प्रभारी जिल्हा समन्वयक डॉ दत्ता देशमुख यांना निलंबित करण्याच्या मागणी साठी पवन राऊत,पंकज गाडेकर ,यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 29 मार्च पासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला. असून  उपोषणाचा आजचा पाचवा  दिवस आहे .त्यांची प्रकृती खालावत आहे . त्यांनी मरण आले तरी बेहत्तर पण डॉ दत्ता देशमुख याना निलंबित केल्याशिवाय उपोषस न सोडण्याचा निर्धार केल्याने  डॉ दत्ता देशमुख यांचे धाबे दणाणले आहे. चोराच्या उलट्या बोंबा या प्रमाणे डॉ देशमुख यांनी उपोषन कर्त्यावर दबाब आणत पोलीसात गुन्हे दाखल करण्याची नोटीस बजावून अकलेचे तारे तोडले आहे  .एकीकडे 3 युवकांचा जीव जाण्याची वेळ आली असताना डॉ देशमुख युवकाच्या  विरोधात षड्यंत्र रचून  उपोषण चिरडन्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप युवानी केला आहे .युवांच्या उपोषनाला सर्वच  स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने डॉ देशमुख यानी  बेकायदेशीर निवड केलेल्या युवा कोराना हाताशी धरून उपोषण कर्त्याना  बदनाम करण्याचा डाव आखला आहे .उपोषणाचा 5 दिवस  असताना जिल्हाधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट न देता डॉ दत्ता देशमुख व उपोषन कर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून  घेऊन दोघाची  बाजू ऐकून घेतली.
 डॉ दत्ता देशमुख यांना झापझुप  करण्याचा देखावा करत वेळ मारून नेल्याचा आरोप युवानी केला आहे .जिल्हाधिकारी नेहरू युवा केंद्राचे पदसिद्ध अध्यक्ष असून युवानी वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना भ्रष्टयाचार होत असल्याचे निवेदन दिले. निवड प्रक्रियेत डॉ दत्ता देशमुख जवळ च्या लोकांना घेणार असल्याचे नावानिशी निवेदन दिले .मात्र त्यांच्या निवेदनाला जिल्हाधिकारी यांनी केराची टोपली दाखविल्याने  डॉ देशमुख यांची हिम्मत वाढली. खुद्द जिल्हाधिकारी हे  डॉ देशमुख यांना पाठीशी घालत असल्याने आता न्याय मागावा तरी कोणाला असे म्हणत युवानी  न्यायासाठी आर्त टाहो फोडला आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.