महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे मंगळवार, दि. ४ एप्रिल २०१७ रोजी पोहरादेवी दौऱ्यावर येत आहेत. ते सकाळी ११.१५ वाजता दिग्रस येथून पोहरादेवीकडे प्रयाण करतील. सकाळी ११.३० वाजता त्यांचे पोहरादेवी येथे आगमन होईल. याठिकाणी ते जगदंबा माता व संत सेवालाल महाराज यात्रा महोत्सवास भेट देणार आहेत. तसेच सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ व रामाराव महाराज यांचे दर्शन घेतील.
दुपारी १२.१५ वाजता पोहरादेवी येथे आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमास ना. राठोड भेट देणार आहेत. त्यानंतर ते बाबनलाल महाराज व स्व. नागोजी नपते पाटील यांच्या समाधीस्थळास भेट देतील. दुपारी १.३० वाजता पालकमंत्री नियोजित सेवासागर जागेची पाहणी करतील. तसेच दुपारी २ वाजता ते वन विभागामार्फत सुरु असलेल्या वन उद्यानाच्या कामाची पाहणी करतील. दुपारी २.२० वाजता पालकमंत्री पोहरादेवी येथून उमरीकडे प्रयाण करतील. दुपारी २.३० वाजता त्यांचे उमरी येथे आगमन होईल, याठिकाणी ते सामकी मातेचे दर्शन घेतील. दुपारी ३ वाजता ते उमरी येथून यवतमाळकडे प्रयाण करतील.
Post a Comment