Monday, April 3, 2017
सावरगाव जिरे येथे आमदार मलीक यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन
Posted by vidarbha on 6:32:00 PM in महेन्द्र महाजन जैन / वाशीम - | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन / वाशीम -
तालुक्यातील सावरगाव जिरे येथे 2 एप्रिल रोजी वाशीम मंगरुळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलीक यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. सदर रस्त्याची समस्या भाजपा तालुका उपाध्यक्ष सौ. उषाताई नारायण वानखेडे यांनी आमदार मलीक यांच्याकडे उपस्थित करुन या रस्त्याच्या कामाची मागणी केली होती. त्यांची ही मागणी पुर्ण करत आमदार लखन मलीक यांच्या हस्ते पुजाअर्चना व कुदळ मारुन या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते. सदर रस्त्याच्या कामाला काही दिवसातच सुरुवात होईल. यावेळी सरपंच दत्ता नागुलकर, उपसरपंच बबन साबळे, सेवा सोसायटी अध्यक्ष सोपानराव पाटील, सदस्य कैलास पाटील, पवन बिटोडे, बंडु अंभोरे, विलास पडघान, कैलास कोल्हे, अरुणा कोल्हे, संतोष आवारे, देविदास अंभोरे, सुभाष तडस, ग्रामसेवक एस. झेड. बरेटीया, सोपान पाटील, विशाल कोल्हे, सुभाष बिटोडे, अरुण पाटील, गजानन तळणकर, पोलीस पाटील काशीराम तडस, प्रशांत वानखेडे, सतिश वाघ, मंगेश बिटोडे, शुभम वानखेडे, शिवाजी गायकवाड, लक्ष्मण नागुलकर व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment