Wednesday, April 19, 2017
२००९ पासुन जय राठोड करतोय पक्ष्यांची सेवा पक्ष्यांना वाचविण्यासाठी रेस्टॉरेंट आणि पाणपोईची निर्मिती
Posted by vidarbha on 6:56:00 AM in दिग्रस(जय राठोड )- | Comments : 0
दिग्रस(जय राठोड )-
खरे पाहता,प्राणी-पक्ष्यांना खाऊ घालणे आपल्या संस्कृतीतच आहे.वसुधैव कुटुंबकमला तिलांजली देत बहुतांश माणसे आपापल्यात मश्गुल असल्याचे दिसतात.मात्र काही संवेदनशील लोक याही पलीकडे जाऊन चालु समस्येला पायबंद घालण्याचा प्रयत्न करतात.उन्हाळा म्हटले की पक्ष्यांची परवड आलीच म्हणुन समजा. पण यावर उपाय म्हणुन तालुक्यातील आरंभी येथील एका अवलिया पक्षीमित्राने न थकता २००९ पासुन पक्षी संवर्धनाचा विडा उचलला आहे.जयकुमार राठोड असे या पक्षीमित्राचे नाव असुन तो दरवर्षी पक्ष्यांसाठी रेस्टॉरेंट आणि पाणपोई उभारतो.
पक्षी संवर्धन हा तसा बहुआयामी विषय आहे.पक्षी स्वरक्षण आणि संवर्धन चळवळीला अनेक पदर आहेत.माणसातील संवेदनशीलता जागी असली तर धावपळीचे आयुष्य जगणारी देखिल निसर्गाप्रति असलेली जबाबदारी म्हणुन पक्ष्यांसाठी खाद्यान्न आणि पाण्याची सोय करतात.आज गावपातळीवरही पक्ष्यांची संख्या कमी होत चालल्या असुन त्यांचे रक्षण व्हावे,यासाठी जयकुमार राठोड हा तरुण गेली ९ वर्षांपासुन झटतो आहे.पक्ष्यांसाठी झाडांचा आधार घेत त्याने रेस्टॉरेंट मध्ये शिळे अन्न, भात, कडधान्य इत्यादी तर बाजुलाच उथळ मातीचे जलपात्र ठेवले आहे.या उपक्रमाला त्याने 'राघू-मैना रेस्टॉरेंट' व 'बुलबुल पाणपोई' असे नाव दिले आहे.या ठिकाणी चिमणी,कावळा, बुलबुल,तितर असे विविध प्रजातींचे पक्षी तृष्णातृप्तीसाठी येतात.झाडावरच खाण्या-पिण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे दिवसभर पक्ष्यांचा किलबिलाट राठोड यांच्या घरी जाणवते. जय राठोड हा तरुण या मुक्या पक्ष्यांचा भाऊ बनला आहे.त्याने या उपक्रमासाठी अनेक जणांना प्रेरित केले आहे.पक्ष्यांचा किलबिलाट जय राठोड ला एकप्रकारे समाधान देऊन जाते.
पक्षी निसर्गचक्राचे एक अविभाज्य अंग आहे.उन्हाळ्यात पाण्याअभावी पक्षी जीवाला मुकतात. हीच नाडी ओळखत मी त्यांना वेळेवर अन्न, पाणी,निवारा उपलब्ध करून देतो.शिळ्या अन्नामुळे अन्नाची नासाडी देखील थांबते.पर्यावरण संतुलित राहावे,यासाठी माझी धडपड आहे,असे पक्षीमित्र जयकुमार राठोड सांगतात.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment