ठाणे येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संकल्प सभा
ठाणे– अयोध्येत राममंदिर का बनवायला हवे, याविषयी लोकांना ठाऊक नसणे, हे दुर्दैव आहे. लोकांनी आपला धर्म आणि संस्कृती समजून घेतली पाहिजे. तिचा अभ्यास केला पाहिजे. तसे झाल्यासच आपण राममंदिर उभारण्याचे कार्य प्रभावीपणे करू शकतो, असे प्रतिपादन महंत महावीर दासजी महाराज यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने येथे घेण्यात आलेल्या संकल्प सभेत ते बोलत होते.
विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत राममंदिर उभारण्याचा निर्धार केला आहे. सोमनाथ मंदिरासाठी ज्याप्रकारे संयुक्त अधिवेशन घेऊन प्रस्ताव पारित केला त्याच धर्तीवर रामजन्मभूमीविषयी सरकारने तोडगा काढावा, अशी मागणी सभेत करण्यात आली.
या वेळी विहिंपचे विभागमंत्री श्री. विक्रम भोईर, ठाणे जिल्हा मंत्री श्री. दीपक मेढेकर आदी उपस्थित होते.

अन्य मान्यवरांचे विचार
राममंदिर उभारणीसाठी स्वतःत सामर्थ्य निर्माण करा ! – श्री. चंपतराय, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री
ज्याप्रमाणे इस्रायलसारख्या लहान देशातील लोकांनी अपमान लक्षात ठेवून संघटित होऊन त्यांचे अस्तित्व टिकवले, त्याप्रमाणे आपणही राममंदिर उभारणीसाठी स्वतःत सामर्थ्य निर्माण करायला हवे.
रामाचे मंदिर बांधण्यासाठी संघर्ष करावा लागणे गंभीर – श्री. शंकर गायकर, विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री
आपल्या मनात हिंदुत्वाची भावना ठासून असायला हवी. ज्या श्रीरामाने आदर्श राज्य, आदर्श पती, एकबाणी, एकवचनी यांचा आदर्श दिला, त्याचे मंदिर बांधण्यासाठी संघर्ष करावा लागणे, हे गंभीर आहे.
Post a Comment