चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -
१९९०च्या आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात नाटकाकडे मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. या काळातील उत्तम नाटकांना नोंद घेण्याइतपत प्रेक्षक प्रतिसाद मिळत नव्हता. टीव्ही मालिकांच्या सस्त्या करमणुकीशी स्पर्धा करत व्यावसायिकांनी विनोदी नाटके देऊन प्रेक्षकांनावश करून पाहण्याचा सपाटा लावला होता. सर्वसामान्य माणसांच्या जीवनशैलीत जागतिकीकरणोत्तर बदलांनी इतका प्रभाव टाकला होता की मराठी मध्यमवर्गाने तोवर टिकवून धरलेली त्याची सांस्कृतिक ओळखही बदलू लागली होती. या बदलांत मराठी माणसाच्या करमणुकीच्या यादीतले नाटकाचे अग्रस्थान घसरत घसरत खूप खाली गेले. तशात मराठी चित्रपटांनी आश्चर्यकारकरीत्या उचल खाल्ली आणि नाटकांना आणखी एक धक्का बसला. असे असले तरी एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मराठी नाटकांना परत ऊर्जितावस्था आली. याच रंगभूमीवर आता शहरात सुध्दा महारूद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे 'शांतेच कार्ट चालु आहे' तुफान भन्नाट विनोदी नाटकाचे ९ एप्रील रविवारी सायंकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक जिल्हा परीषद हायस्कुलमध्ये आयोजित या नाटकाचे लेखक श्रीनिवास भणगे असुन दिग्दर्शक दिपक बनसोड आहे. संपुर्ण नाटकाची निर्मीती चेतन भोले या युवकाने केली आहे. नाटकातील कलाकार हे चांदुर रेल्वे तालुक्यातीलच आहे. उद्या होणारे नाटक हे तुफान विनोदी असुन चांदुर रेल्वे वासीयांना नक्कीच हसविणार आहे. नाममात्र शुल्कमध्ये नाटक बघता येणार असुन तरी जास्तीत जास्त तालुकावासीयांनी उपस्थित राहुन नाटक बघण्याचे आवाहन संस्थेच अध्यक्ष चेतन भोले, उपाध्यक्ष सचिन उईके, सचिव अमोल ठाकरेसह महारूद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी केले आहे.
Saturday, April 8, 2017
'शांतेच कार्ट चालु आहे' तुफान विनोदी नाटक उद्या - महारूद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन
Posted by vidarbha on 5:52:00 AM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment