चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)-
मार्च महिना संपल्यानंतर वातावरणात बदल होऊन कडक उन्हाळयाला सुरुवात झाली आहे. परिणी सर्वांना आपली तहान भागविण्यासाठी थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली. आज रोजी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्या माठाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना माठ विकत घेणे कठीण झाले आहे.
मागील कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक थंड पाणी पिण्यासाठी मातीच्या मडक्यांचा वापर करतात. या माठामध्ये थंडगार पाणी राहात असल्यामुळे या मडक्यांना गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाते. दहा वर्षापूर्वी माठाच्या किंमती पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंत होती. ती मागीलवर्षी शंभर ते दिडशे रुपयांपर्यंत पोहोचली होती. तर यावर्षी एका माठासाठी दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत. पूर्वी माती, पर्हाटी, घोड्याची लीद मोफत मिळत होती. आता नदीत मातीच शिल्लक नसल्यामुळे मातीसह कपाशीचे भर सुद्धा विकत घ्यावे लागते तर घोड्याची लीदसाठी कुंभारांना व्यवसायिकांना वनवन भटकावे लागत आहे.
तसेच वाहतूक खर्चातही भरमसाठ वाढ झाली आहे. पूर्वी गाढव व बैलजोडीने वाहतूक करण्यात येत होती. परंतू आता बैलजोड्याच शिल्लक राहिल्या नसून गाढवाची सुद्धा संख्या सुद्धा बरीच कमी झाली आहे. त्यामुळे कुंभार व्यवसायिकांना वाहतूक़ करण्यासाठी मिनीडोर, घोटा हत्ती, व अँपेचा वापर करावा लागत अाहे. माठ, रांजण, घागर, शहरात विक्रीला नेल्यानंतर खाण्यापिण्याचा तसेच वाहतुकीचा खर्च सोसावा लागतो. उन्हाळा सुरु होताच व्यावसायिकांनी तयार केलेले रांजण, माठ व घागरी विक्रीस आणल्या आहेत. रांजण मात्र तयार करण्यास जास्त मेहनत घ्यावी लागत असल्यामुळे ते मिळेनासे झाले आहे.
Saturday, April 8, 2017
गरिबांच्या फ्रीजच्या किंमतीत मोठी वाढ
Posted by vidarbha on 5:55:00 AM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment