BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

१५ एप्रिल पर्यंत शासकिय तूर खरेदीचे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे नाफेडने उडविली धज्जीया - चांदूर रेल्वेत नाफेड तूर खरेदीचे केंद्र बंद चे आदेश


चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-


शेतकऱ्यांची  तूर खरेदी करे पर्यंत नाफेडची शासकिय तूर खरेदी१५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.मात्र दिलेली मुद्दत संपायच्या आत नाफेडने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करीत ४ एप्रिल पासून चांदूर रेल्वे चे तूर खरेदी केंद्र  बंद केले. त्यामूळे स्थानिक बाजार समितीच्या आवारात ७०० शेतकऱ्यांचे  ६ हजार क्विंटल तूर पडून आहे. बाहेर व्यापारी कवडीमोल दराने तूर खरेदी करीत असल्याने तूर विकायची कुठे असा मोठा प्रश्न शेतकर्यांना  पडला आहे.
नाफेडची तूर खरेदी सूरू असतांना साठवणूकीसाठी गोदाम नसल्यानेफेब्रूवारी व मार्च महिण्यात विस दिवस तूर खरेदी बंद होती.त्यावेळी उपसभापती अशोक चौधरी यांच्या उपोषणामूळे एसडीओ वऱ्हाडे  यांच्या मध्यस्थीमूळे व आमदार जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्याना  घातलेल्या घेरावामूळे नाफेद्ची  तूर खरेदी सुरू झाली.त्यानंतर बारदाणा नसल्याने व मार्च एन्डींगचे कारणे देत तूर खरेदी बंद होती.त्यामूळे शेतकऱ्यांनी  विक्रीसाठी आनलेली ६ हजार क्विंटल तूर पंधरा दिवसापासून बाजार समितीच्या आवारात पडून आहे. तसेच ८ मार्च नंतरचे चेक शेतकऱ्यांना  मिळालेले नाही.त्यामूळे शेतकरी अडचणीत सापडले असुन
चांगलचे संतप्त झाले आहे.तर शासनाने चांदूर रेल्वेचे नाफेड  तूर खरेदी त्वरीत सुरू न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाजार समितीच्या संचालक मंडळाने प्रशासनाला दिला.तालुक्यातील शेतकऱ्यांची  स्फोटक स्थिती पाहता प्रशासन
कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारीयांनी  केले बाजार समिती संचालकाचे सांत्वन
मागील आठ दिवसापासून चांदूर रेल्वे येथील नाफेड  चे तूर खरेदी केंद्र  बंद आहे.त्यामूळे बाजार समितीच्या आवारात ६ हजार क्विंटल  तूर पडून आहे. नाफेडने त्वरीत तूर खरेदी सुरू करावी यासाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.प्रभाकर वाघ, उपसभापती अशोक चौधरी, संचालक प्रदीप वाघ, प्रविण घुईखेडकर, प्रदीप जगताप, बंडू मुंधडा, हरिभाऊ गवई, मंगेश धावडे, रवींद्र देशमुख, सुनिता काळमेघ, सविता देशमुख, अतुल चांडक, रमेश महात्मे, रविकांत देशमुख, वैशाली
ठाकरे, भानुदास गावंडे, राजकुमार जालान, प्रदीप गुजर, दिलीप गावंडे यांच्यासह अनेक शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी श्री किरण गित्ते यांना निवेदन देऊन चर्चा केली.यावेळी जिल्हाधिकारी गित्ते यांनी जिल्हात चांदूर बाजार,अंजनगाव सुर्जी, अचलपूर व चांदूर रेल्वे असे चार केंद्र  बंद असून त्यापैकी दोन  केंद्र  सुरू झाले असुन चांदूर रेल्वे केंद्र ६ एप्रिल रोजी सुरू करणार
असल्याचे सांगीतले. त्यावेळी सभापती प्रभाकर वाघ यांनी ही माहिती आम्ही शेतकऱ्यांना  देतो असे म्हणताच
जिल्हाधिकाऱ्याणी  त्यांना थांबवित तसे करू नका असा सल्ला दिला.त्यामूळे जिल्हाधिकारी फक्त शेतकऱ्यांचे सांत्वन करतांना दिसले. नाफेडची केवळ ५६ दिवस तूर खरेदी नाफेडची तूर खरेदी २८ डिसेंबर पासून सुरू झाली तर ५ जानेवारीला ५.९१ क्विंटल पहिली तूरची खरेदी झाली.२८ डिसेंबर
ते २९ मार्च २०१७ पर्यंत एकूण  ९० दिवस तूर खरेदीसाठी मिळाले. त्यापैकी केवळ ५६ दिवस तूर खरेदी झाली.१७ हजार ८१२ क्विंटल १९किलो ऐवढी तूर खरेदी करण्यात आली. प्रत्यक्षात २० फेब्रुवारी ते ३ मार्च २०१७ पर्यंत गोदाम अभावी तूर खरेदी बंद होती.९ ते १७ मार्च बारदाणा नसल्याने तूर खरेदी बंद होती आणि ३० मार्च ते ३ एप्रिल नाफेडने मार्च एन्डचे कारण देत तूर खरेदी बंद ठेवली.याशिवाय ९० दिवसाच्या कालावधीत १४ रविवार,५ हॉलीडे व ६ दुसरा/चवथा शनिवार आल्याने तूर खरेदी झाली नाही. स्थानिक बाजार समितीत तूरची आवक व बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची  किती
तूर पडून आहे या आढावा न घेता नाफेडने ४ एप्रिल पासून चांदूर रेल्वे बंदचे आदेश पाठविले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.