Wednesday, April 19, 2017
सेनगांवात पशु पक्षानां पाणी पिण्यासाठी शिवसेनेने ५०१ पाणवठे लटकवुन केला विक्रम
Posted by vidarbha on 6:33:00 AM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड -
सेनगांव:- सेनगांव तालुक्यासह संपुर्ण हिंगोली जिल्हा उन्हाने होरपळत असतांना मणुष्या प्रमाणेच पशु पक्षी ही पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे भयावह चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
सेनगांव येथील शिवसेना हिंगोली उप जिल्हाप्रमुख संदेशजी देशमुख यांची प्राणीमात्रा वरील दया आज दिसुन आली. पशु पक्षानां पिण्यासाठी पाणी मिळावे या भावनेतुन सेनगांव शहरात झाडं तिथे पाणवठा तयार करुन झाडाला पाणवठे लटकविले इतकेच नव्हे तर आपल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन पाणवठ्यात रोज पाणी पुरविण्याची विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. सेनगांव शहरात अनेक ठिकाणी झाडावर पाणवठे लटकविण्यात आले आहेत. तसेच हा उपक्रम पावसाळा सुरु होईपर्यंत या पाणवठ्यातुन पक्षांना पाणी पुरविण्यात येईल व सेनगांव तालुक्यातील प्रत्येक गांवात शिवसेनेच्या वतीने पशु पक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी झाडांना पाणवठे लटकविण्यात येतील असे तेज न्युज हेडलाईन्स च्या प्रतिनीधीशी बोलतांना हिंगोली शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदेशजी देशमुख म्हणाले. सदर पाणवठे सेनगांव शहरातील तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन व रस्त्या लगतच्या सर्वच झाडावर ठेवण्यात आले आहेत. शिवसेनेच्या या अनोख्या उपक्रमा बद्दल सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे. यासाठी युवासेना सेनगांव उप शहराध्यक्ष अनिल गित्ते, जगदीश गाढवे- पाटील, विकास लोहटे, गणेश रंजवे, देविदास कुंदर्गे, गजानन कासार, संदिप शेळके, राजु वाघमोडे, गोपाल टाकरस, जयपाल खंदारे, जिवन होडबे, रोहीदास मानकर, बालु सुर्यवंशी आदी शिवसैनिकांनी परीश्रम घेत पाणवठ्यात पाणी पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment