अपूर्व उत्साहात पार पडली सांगवी येथे पुणे जिल्ह्यातील १०० वी हिंदु धर्मजागृती सभा
सांगवी (पुणे)– आज देशात देशद्रोहाचे विष पसरले आहे. हा देशद्रोही व्हायरस त्वरित न काढल्यास संपूर्ण देश पोखरला जाईल. या देशात देश आणि हिंदुविरोधी वातावरण खपवून घेतले जाणार नाही, हे ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे. देशविरोधी परिस्थितीचा निःपात करण्यासाठी क्षात्रभावाची आवश्यकता आहे. शक्ती आणि भक्ती यांचा संगम झाला, तरच कार्य पूर्णत्वाला जाईल. या सामर्थ्यावर देश आणि धर्मद्रोही व्हायरस निकाली काढू, असे उद्गार श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत काढले. १६ एप्रिलला येथील पी.डब्ल्यू.डी. पटांगणात सायंकाळी ६ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी श्री. मुतालिक यांनी धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी कृतीशील होण्याचे आणि त्याद्वारे राष्ट्रविघातक शक्तींच्या विरोधात लढण्याचे उपस्थित हिंदूंना आवाहन केले. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट आणि सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनीही उपस्थितांना संबोधित केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असलेल्या हिंदु जनजागृती समितीची पुणे जिल्ह्यातील ही १०० वी सभा अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. पू. विनायक फडके यांची वंदनीय उपस्थिती या वेळी लाभली. या सभेला २ सहस्र ५००हून अधिक सांगवीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, तसेच छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून सभेला प्रारंभ करण्यात आला. वेदमूर्ती श्रीनिवास करंबळेकर, पुरोहित कौस्तुभ जोशी, प्रमोद डंके यांनी वेदमंत्रपठण केले.
श्री. प्रमोद मुतालिक पुढे म्हणाले,
१. राष्ट्र आणि संस्कृती यांवर अनेक आघात होऊनही हिंदु समाज निष्क्रीय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही स्वातंत्र्यप्राप्ती आणि समाजाला जागृत करणे यांसाठी क्रांतीकारकांना प्रयत्न करावे लागले होते. देश आणि धर्म सुरक्षित असेल, तर समाज सुरक्षित राहू शकेल. धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता आहे. हिंदूसंघटनाचे कार्य क्रांतीकार्यच आहे.
२. इस्लामी, ईसाई, पुरोगामी, तसेच समाजवादी आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. एखादी मशीद तोडली गेली, एखाद्या मुसलमानाची हत्या झाली, तर पुरोगामी त्याविषयी टाहो फोडतात; मात्र काश्मीरमध्ये झालेला हिंदूंचा वंशविच्छेद, तसेच केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांमध्ये हिंदूंना वेचून वेचून त्यांच्या केल्या जाणार्या हत्या यांविषयी अवाक्षरही काढत नाहीत. हिंदूंना मानवाधिकार नाहीत का ? आज काश्मिरी हिंदू गेली २५ वर्षे आपल्याच देशात निर्वासित म्हणून रहात आहेत. देशाच्या अन्य भागात रहाणार्या काश्मिरी हिंदूंचे पुन्हा काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन होईपर्यंत आम्ही लढा देऊ.
३. हा देश प्रभु श्रीरामचंद्रांचा असून देशात रामनवमी साजरी करण्यास आडकाठी करणे, रामजन्मभूमीवर राममंदिर उभे न रहाणे, असे प्रकार घडू द्यायचे नसतील, तर हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे. निद्रिस्त हिंदू जागृत झाले नाहीत, तर उद्या देवघरात घंटी वाजवण्यावरही निर्बंध येऊ शकतील.
४. हिंदु युवकांनो, देव, देश आणि धर्म यांसाठी प्राणार्पण करण्याची सिद्धता ठेवा. अपघात आणि आजारी पडून मरण्यापेक्षा प्रभु श्रीरामचंद्रांसाठी अन् राष्ट्ररक्षणासाठी मरण आलेले केव्हाही श्रेयस्कर. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, धर्म आणि सत्य यांचे कार्य करतांना अनेक अडथळे येतात. या अडथळ्यांना पार करून मार्गक्रमण करणाराच खरा धर्मवादी असतो.
५. राजकीय व्यक्ती, पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून आतापर्यंत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य बंद पाडण्यासाठी अनेक षड्यंत्रे रचली गेली; मात्र या सर्व प्रयत्नांना दोन्ही संघटना पुरून उरल्या. त्यांचेे अभिनंदन !
Post a Comment