BREAKING NEWS

Tuesday, April 18, 2017

देशातील पाकच्या हस्तकांना फासावर लटकवा ! – श्री. सुनील घनवट <><>सांगवी येथे पुणे जिल्ह्यातील १०० वी हिंदु धर्मजागृती सभा


कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानातील अधिवक्त्यांनी त्यांचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे. याची गंभीर नोंद घेऊन केंद्र शासनाने पाकला वठणीवर आणण्यासाठी देशातील पाकच्या हस्तकांना फासावर लटकवावे. कुलभूषण जाधव प्रकरणी देशातील पाकप्रेमी कलाकार, साहित्यिक, पुरोगामी यांना काहीच कळवळा कसा आला नाही ? कुलभूषणसारख्या देशप्रेमीला फासावर लटकवले जात असतांना इतरवेळी गळे काढणारे पाकप्रेमी कलाकार आणि पुरोगामी गप्प का बसले आहेत ? हिंदुविरोधी पुरोगाम्यांच्या हत्येविषयी गळा काढणारे राष्ट्रभक्त हिंदूंच्या हत्येविषयी मूग गिळून असतात.
पुणे जिल्ह्यातील काळेवाडी येथे मुसलमानबहुल भाग असल्याने तेथे रामनवमीला हिंदूंना कार्यक्रम करण्याला पोलिसांनी अनुमती दिली नाही. भारत हा मुसलमानबहुल नव्हे, तर हिंदुबहुल देश आहे, हे पोलीस विसरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही मशिदींवरील भोंगे काढण्याची कारवाई करण्याचे धाडस पोलीस दाखवत नाहीत. आता काँग्रेसचे राज्य गेले आहे, याची जाणीव ठेवून पोलिसांनी पूर्वीची हिंदुद्वेषी आणि नकारात्मक मानसिकता पालटली पाहिजे. गुजरात राज्याप्रमाणे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मांतरविरोधी नवीन कायदा केला पाहिजे. ख्रिस्ती मिशनरी वेगवेगळी आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन सरकारीकरण केले आहे. सरकारने मग दापोडी येथील चर्चचेही सरकारीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. आज बर्‍याच ठिकाणी हिंदू ऊरूस हा शब्द वापरतात; मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी ऊरूस हा शब्द कधीच वापरला नाही. त्यांनी जगदीश्‍वरची यात्रा केली, असे म्हटले आहे. म्हणजे हिंदूंनी यात्रा हा शब्दप्रयोग केला पाहिजे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.