महेंद्र महाजन जैन / वाशिम: -
स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत कारंजा तालुका हागणदारीमुक्त केल्या नंतर स्वच्छता मिशन कार्यक्रमाने चांगलीच गती घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दोन महिन्यात संपुर्ण तालुका हागणदारीमुक्त करण्याबाबत नियोजन पंचायत समिती मध्ये आयोजित एका बौठकित (दि. 5 रोजी) करण्यात आले आहे.
पंचायत समितीच्या सभागृहात सर्व ग्रामसेवक, सरपंच यांच्या आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. सीईओ गणेश पाटील यांनी ग्रामपंचायत निहाय कामाचा आढावा घेतला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी योगेश जवादे आणि जिल्हा परिषद सदस्य राठोड यांची उपस्थिती होती.
आपली ग्रामपंचायत हागणदारीमुक्त करणाज्या ग्रामसेवंकांचे सीईओ पाटील यांनी अभिनंदन केले. परंतु आपल्या कामात पिछाडीवर असणाज्या ग्रामसेवकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. गाव आणि तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी यथोचित मार्गदर्शनही मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केले.
काय म्हणाले सीईओ गणेश पाटील?
1. शौचालय बांधुन वापर करणाज्या पात्र लोकांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची ग्रामसेवकांनी हमी द्यावी.
2. शौचालय बांधतांना प्रेमाची भाषा आणि पौसे देतांना उपेक्षा किंवा टाळाटाळ करणे हे चुकीचे आहे.
3. मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन ग्रामसेवकांनी लोकांची ग्रामविकासाबाबत कामे करावी. त्यासाठी गावातील लोकांच्या संपर्कात रहावे.
4. संपुर्ण गाव ओडीएफ करण्यासाठी बांधकाम साहित्य, मिस्त्री, लाभार्थी संख्या यांचे सुक्ष्म नियोजन करावे.
5. गावात पुरेशा प्रमाणात जनजागृती करावी. गुड मॉर्निंग, टमरेल जप्ती, गृहभेटी यासारखे अभियान राबवुन लोकांना टोचतील अशा भाषेत संदेश द्यावे.
6. गावातील चांगल्या लोकांना (स्वच्छाग्रही अथवा व्हिलेज च्ॉम्पिअन) सोबत घेऊन काम करावे.
यापुढे एक खड्डा असलेल्या शौचालयाला निधी नाही
शासनाच्या निर्देशानुसार दोन शोष खड्ड¶ाचे शौचालय बांधणे अपेक्षित आहे. मात्र अनेक ठिकाणी केवळ एकच खड्डा करुन शौचालयाचे प्रोत्साहन अनुदान घेण्यात आले. या बाबीकडे 31 मार्च पर्यंत फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. आता 1 एप्रिल 2017 पासुन प्रोत्साहन अनुदान वितरीत करतांना दोन शोष खड्डचे शौचालय असल्याची खात्री करण्यात येणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले. तांत्रिकदृष्ट योग्य आणि पर्यावरणाला हाणी पोचणार नाही अशा शौचालयाचे निर्माण करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

Post a Comment