*शहरात पुरातन पितळ व तांब्याच्या वस्तू आजही जतन करून ठेवल्या आहेत*
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /--
अचलपूर शहर पुरातन शहर म्हणून ओळखले जाते येथे जवळपास सर्वच धर्मीय पुरातन ऐतिहासिक वस्तू आजही पाहायला मिळतात. राजे, बादशाहा,ब्रीटीशांच्या दौ-यानंतर अचलपूर मध्येे नबाबांचे राज्य होते सर्वानी आपल्या कार्यकाळात एकापेक्षा एक सुधारणा व विकासकार्य केले याचे प्रतीक म्हणजे येथील पुरातन मश्जिद मंदिरे आहेत.सोबतच त्यांच्या काळातील काही वस्तू या आधुनिक काळात उपलब्ध असल्याने इतिहासाच्या पुस्तकांची पाने चाळायला भाग पाडतात. तसेच काही लोकांनी आजपर्यंत त्या यूगातील पुरातन वस्तू जपून ठेवलेल्या आहेत.अचलपूर निवासी सै शाकिर अली चे आजोबा सै रियासत अली यांनी तीनशे वर्षाचे जुने कँलेन्ड़र ठेवले होते त्यांच्या पश्चातथा सै बासिद अली यांनी ते जपून ठेवले आता अब सै शाकिर अली यांनी आपल्या वंशजाची निशानी म्हणून त्याची काळजीपूर्वक जपवणूक करीत आहेत.शंभर वर्ष व तीनशे वर्ष असे दोन पितळ धातूपासून बनलेले ह्या कँलेंडर वर दिवस,दिनांक व वर्ष इंग्रजी मध्ये अंकित आहे एक कँलेंडर सन2000 मध्ये संपले. 1700 ते 2000 पर्यंत चाललेल्या या कँलेडर वर तीनशे वर्षाच्या तारखा अंकित आहे तसेच दुसरे कँलेडर शिरिन फ़राज़ च्या अमर प्रेमाची कहानी दर्शवते. दूसरे कँलेडर 1982 ला सुरु झाले व 2081 पर्यंत चालणार आहे.एवढेच नव्हे तर याकाळातील पितळच्या घड्याळावर मोराची नक्षी आहे त्यावेळेस चे इत्रदान, राईस डीश,पानी देण्याचा ट्रे व पानदान आजपण त्याकाळाची आठवण देते.या कँलेंडरांना दिवसाचे हिशोबाने मिळवल्यावर तारीख व वर्ष माहित पडते. सै शाकिर ने ह्या ऐतिहासिक वस्तू आजही आपल्या जवळ निट जपून ठेवलेल्या आहेत.देशाच्या धार्मिक,ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेत कोठेतरी अचलपूर चे सुध्दा नाव जुडलेले आहे. मान सिंग च्या समाधी पासून अलाउद्दिन खिलजी पर्यंत अचलपूर मध्ये त्यांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट होते म्हणुनच अचलपूर ला ऐतिहासिक शहर म्हटल्या जाते आजही या ऐतिहासिक वस्तू त्याची ग्वाही देत आहेत.
Post a Comment