अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर शहरातील नामवंत शाळा सिटी हायस्कूल च्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी सुनिल अंजनकर यांची नियुक्ति करण्यात आली.
अचलपूर शहरात सिटी हायस्कूल सर्वपरिचित शाळा येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदावरून मुक्ताताई धानोरकर 30 एप्रिल रोजी शासकीय नियमानुसार सेवानीवृती झाल्या त्यांच्या नतंर सेवाजेष्ठतेनुसार येथे कार्यरत असलेले सुनिल अंजनकर यांनी महाराष्ट्र दिनी कार्यभार सांभाळला त्यांना संस्थेच्या अध्यक्षा माधुरीताई देशमुख सचिव अँड.दिपकराव देशमुख,जेष्ठ शिक्षक हरदास सर व सर्व व्यवस्थापक मंडळाने यांनी त्यांच्या उज्वल कार्यकाळाकरीता शुभेच्छा दिल्या.सुनिल अंजनकर हे विज्ञान शिक्षक म्हणून संस्थेच्या जानकीबाई देशमुख कन्या शाळेत कार्यरत होते नुकतेच उपमुख्याध्यापक म्हणुन सिटी हायस्कूल येथे स्थलांतरीत झाले व आपल्या सुस्वभावाने येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात नावलौकिक मिळवला व आपल्या सुशासनाने व सेवाजेष्टतेनुसार मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदावर व्यवस्थापक मंडळाने त्यांना नियुक्त केले.विविध सामाजिक संघटनेसोबत जुळलेले अंजनकरसर प्रकाशझोतात आलेल्या सिटी हायस्कूल ला पुन्हा प्रकाशमान करतील यात शंका नाही त्यांच्या या पदोन्नति मुळे पंचक्रोशीत शिक्षण विभागात कर्तव्यदक्ष सोबती मिळाल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment