अमरावती
- हिंदु जनजागृती समिती व समविचारी हिंदुत्ववादी संघटना यांच्या तर्फे स्थानिक राजकमल चौक येथे १३ जुन या दिवशी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत राष्ट्रीय हिंदु आंदोलन घेण्यात आले. त्यावेळी बोलतांना शिवसेनेचे शहरप्रमुख श्री नरेंद्र केवले म्हणाले, शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणुक देण्याचा आदर्श घालुन दिलेला आहे. त्यानुसार साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता देखील त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. आज शिवाजी महाराज असते तर असे झालेच नसते किंवा त्यांना तात्काळ कठोर शासन झाले असते. त्यामुळे आमच्या मातेसमान असलेल्या साध्वींचा छळ करणार्यांवर कठोर कारवाई करावी असे श्री केवले यांनी शासनाला आवाहन केले. श्री शिवप्रतीष्ठान हिंदुस्थान चे श्री अभिषेक दिक्षीत यांनी यावेळी सांगीतले की, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मुर्तीला दोन वर्षांपुर्वी रासायनिक लेप लावण्यात आला. परंतु प्रत्येक धर्माला एक स्वतःचे शास्त्र असते. इतर धर्मीयांनी काहीही करायचे तरी त्यांच्या धर्मगुरूंची आज्ञा घेतली जाते परंतु महान अशा हिंदु धर्मात मात्र वैज्ञानिक स्वतःच्या बुद्धीने विचार करून कृती करतात. लेप लावणे योग्य की अयोग्य यासाठी हिंदु धर्मातील संतांचे मार्गदर्शन घ्यायला हवे होते. आपल्याला धर्मशिक्षण नसल्याने आपल्या संतांचे महत्व नसल्याने अशा अयोग्य कृती केल्या जातात. असे करणाऱ्याला कठोर शासन द्यावे असे त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी श्री योगवेदांत सेवा समितीचे श्री मानव बुद्धदेव, हिंदु जनजागृती समितीचे श्री हेमंत खत्री, सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी इत्यादींनी सुद्धा आपले याविषयी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. अर्चना मावळे यांनी केले. यावेळी श्री शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानचे श्री महेश लडके, श्री करण धोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री मनोज विश्वकर्मा, श्री स्वराज शर्मा, श्री विलास सावरकर, तसेच सनातन संस्थेच्या सौ. बेला चव्हाण, सौ. स्मिता ठाकरे इत्यादींसह एकूण ४० हून अधिक जण उपस्थित होते. वरील विषयांवर आज दिनांक १४ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन आंदोलनातील विविध मागण्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी श्री परदेसी यांना आज निवेदन देण्यात आले. त्यावेळी तुम्ही सांगत असलेली माहिती योग्य आहे असे त्यांनी मत व्यक्त केले व निवेदन पुढे पाठवू असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख श्री नरेंद्र केवले, सनातन संस्थेचे श्री गिरीष कोमेरवार, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनुभूती टवलारे, श्री नीलेश टवलारे इत्यादी उपस्थित होते.
Post a Comment