चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान)\
शाळेचा पहिला दिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे वैशिष्ट्य जपणारे स्थानिक गटसाधन केंद्र येथील विषय साधन व्यक्ति यांनी २७ जुनला शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आदराचे स्थान देत पालखीमधुन वाजत गाजत शाळेत आणले. यावेळी जि.प. अध्यक्ष नितिन गोंडाने यांनी ही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पळसखेड़ येथील जि.प. प्राथमिक शाळा येथे तालुक्याचा शाळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी विद्यार्थ्यांचे आवडते खेळने असलेले फुग्यांनी संपूर्ण शाळा सजविण्यात आली होती. बैन्ड-बाजासह सम्पूर्ण गावातुन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी विविध शिक्षणाच्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. सर्वत्र पंढरपुरच्या वारीचे वातावरण असतांना शाळेतील प्रभातफेरीला ही वारीचे रूप देत विद्यार्थ्यांना आदराचे स्थान देत त्यांनाच पालखीत बसवून शाळेतील शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, जि.प. अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन सदस्य, विषयसाधन व्यक्ति यांनी शाळेत आणले. यावेळी बैन्डच्या तालावर विद्यार्थ्यांनी चांगलाच ताल धरला होता.
संपुर्ण प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत ही करण्यात आले. पहिला दिवस म्हणून सर्वांना पोषण आहारात शिरा दिला. तर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी नितिन गोंडाने यांनी विद्यार्थ्यांना फुटबॉल भेट दिले. यावेळी प्रामुख्याने पं.स. सदस्य भिमरावजी करवाड़े, गुलफराज पठान, शाळा समितीचे अध्यक्ष महेश देशमुख, रामरावजी ढगे, देवीदासजी गाढवे, शालिक पुनसे, वंदनाताई गोंडाने, शालू शेलोकार, सुनीता पाटिल, सारिका मोरे, गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे, विस्तार अधिकारी आबिद हुसेन, सदाशिव दाभाडे, विषय साधन व्यक्ति विवेक राऊत, मंगेश उल्हे, वर्षा गादे, जि.प. मुख्याध्यापिका लता भटकर, उर्दूचे मुख्याध्यापक अब्दुल सत्तार, हायस्कुलचे मुख्याध्यापक चिरमारे, आशा लादे, जोत्स्ना साबळे, बड़वाइक, स्वाती टोंगसे, श्री वाहिद आदींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला..
Post a Comment