Showing posts with label
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ).
Show all posts
Showing posts with label
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ).
Show all posts
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )अमरावती येथील संत लहाणूजी सभागृहात शाखा अभियंता श्री. नान्हे यांच्या आईच्या पुण्यस्मरण सोहळ्यात तालुक्यातील बग्गी येथील अंतरा व चाणक्य चवाळे यांचा बालकलाकार म्हणून सत्कार करण्यात आला. आई या विषयावर अंतरा व चाणक्य प्रकाश चवाळे यांनी सुंदर गायन केल्याने सर्व जि.प. पदाधिकारी व अधिकारी भारावून गेले होते. यावेळी चाणक्य व अंतरा यांचा गौरवपुर्ण सत्कार अमरावती जि.प.चे बांधकाम व शिक्षण सभापती जयंतराव देशमुख, कार्यकारी अभियंता श्री. डोंगरे, शाखा अभियंता श्री.लाहोरे, अमरावती जि.प.चे अभियंता श्री.पवार, शाखा अभियंता श्री.नान्हे साहेब यांच्या करकमलाने भेट वस्तू व पुष्प गुच्छ देवून करण्यात आला. यावेळी भुषण शेळके, प्रविण मते तसेच जि.प.चे कर्मचारी व अधिकारी बहूसंख्येने उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीकृष्ण बैलमारे यांनी तर आभार प्रकाश चवाळे यांनी मानले.
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
 |
शाळास्तरावर मोहम्मद अब्दुल्ला प्रथम |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १३ जून रोजी दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित झाला. यामध्ये स्थानिक नगर परीषद आझाद उर्दु हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला असुन शाळास्तरावर मोहम्मद अब्दुल्ला प्रथम तर अर्शिया कौसर व्दितीय व राहेमीन अंजुम ने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. अगोदरच विलंब झालेल्या या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून होते. यामध्ये स्थानिक नगर परीषद आझाद उर्दु शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकुन ३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते व ३४ ही विद्यार्थि उत्तीर्ण झाले. शाळास्तरावर मोहम्मद अब्दुल्ला मकबुल अहेमद याने ७४.२० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला. तर अर्शिया कौसर अब्दुल मुश्ताक हिने ७३.८० गुण घेऊन व्दितीय व राहेमीन अंजुम अब्दुल वहीद हिने ७२ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेतील ३४ पैकी १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई - वडील, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अब्दुल करीम देशमुख, सहाय्यक शिक्षक ए.एच. पठाण, विकार शाह, अर्शिया जबीन, मो. वसीम यांना दिले आहे. विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे सह शिक्षण सभापती व इतर नगरसेवकांनी अभिनंदन केले आहे. तसेच शाळेच्या या यशाबद्दल समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
स्थानिक नगर परीषद हद्दीतील राम नगरातील खचलेल्या नालीचे त्वरीत दुरूस्तीकरण करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. शहरातील राम नगरमधील माणिकराव वाडेकर यांच्या घराजवळील नाली काही दिवसांपुर्वी खचली. अशातच आता पावसाळ्याला सुरूवात होत आहे. पावसाळ्यात या नालीचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणुन या नालीचे नगर परीषद प्रशासनातर्फे तातडीने दुरूस्तीकरण करण्यात यावे अशी मागणी परीसरातील शहरवासीयांनी केली आहे..
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
जगातील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. याच अनुशंगाने ५ जुन रोजी शहरातील वनविभागातर्फे वनविभाग कार्यालय परीसरात वृक्षलागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. स्थानिक वनविभाग कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला वनपरीक्षेत्र अधिकारी अनंतराव गावंडे, अ.भा.ग्रा. पत्रकार संघटेनेचे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, बाजार समिती संचालक हरिभाऊ गवई, पंकज जयस्वाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वनविभाग कार्यालय परिसरामध्ये कडुलिंब, बदाम यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धारही करण्यात आला. सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.सध्याच्या काळातील ग्लोबल वॉर्मिंगचे संकट लक्षात घेता प्रत्येकाने नियमितपणे वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे असे मत पत्रकार गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले.
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
सरकारने सांगितल्याप्रमाने शेतकऱ्यांनी शेतात तुर पिकवली. गेल्यावर्षी १२ हजाराचा भाव असतांना यंदा ५ हजारावर आला. म्हणजेच क्विंटलमागे ७ हजार कमी झाले असतांना सुध्दा अद्यापही सर्व शेतकऱ्यांची तुर खरेदी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची संपुर्ण तुर तत्काळ खरेदी करावी व इतर मागण्यांसाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या १० मे रोजी प्रहारचे संस्थापक आमदार बच्चु कडु व शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच़्या नेतृत्वात डेरा आंदोलन करण्यात येणार आहे. चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात संचालक मंडळ आपल्या पदांचा गैरवापर करत गैरप्रकार करत असल्याचा आरोप करीत नुकतेच स्थानिक बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले. यानंतर आता पुन्हा प्रहार शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने डेरा आंदोलन होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरातील तुर हमीभावाने खरेदी करा, खरेदी केलेल्या तुरीचा मोबदला २४ तासाच्या आत देण्यात यावा, सरकारने तुर आयातीवर प्रतिबंध लावावा, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संपुर्ण तुरीचा पंचनामा करून तातडीने खरेदी करण्यात यावी या आंदोलनातील प्रमुख मागण्या आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली तुर विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावी. कायद्यानुसार शेतीमाल खरेदी अधिनियम १९६३-६७चे कलम २९ नुसार केंद्राने जाहिर केलेल्या हमी भावाने आपली तुर खरेदी करण्यास सरकारला व बाजार समितीस भाग पाडणार असुन आमदार बच्चु कडु व रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या तुर खरेदी डेरा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रहारचे तालुकाध्यक्ष सौरभ इंगळे, विक्रम तायडे, प्रदिप नाईक, शिवसेनेचे राजुभाऊ निंबर्ते, बंडुभाऊ आंबटकर, मनिष कोहरे आंदींनी केले आहे..
प्रशासनाने घेतली बच्चु कडुंची धास्ती ??
अमरावती जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात बच्चु कडु हे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात प्रसिध्द आहे. ते नेहमीच अपंग बांधव व शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द आपला लढा देत असतात. अशातच त्यांचे शहरात उद्या होणाऱ्या डेरा आंदोलनामुळे बाजार समिती प्रशासनाने पहिलेच धास्ती घेतल्याचे समजते. तसेच यावेळी चांगलाच पोलीस बंदोबस्त तैनात सुध्दा ठेवावा लागणार आहे.
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
चांदुर रेल्वे येथिल वामनराव सिंगणजुडे यांचे दुख:द निधन झाले आहे. शहरातील राम नगर परीसरातील रहिवासी असलेले सेवा निवृत्त मंडल अधिकारी वामनराव गोविंदराव सिंगणजुडे यांचे कर्करोगाच्या आजाराने वयाच्या ७८ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व तीन मुली, सुन, जावाई, नातवंडासह बराच मोठा आप्तपरीवार आहे. त्यांच्यावर स्थानिक हिंदु स्मशान भुमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना एक दिवस मजुरांसोबत या संकल्पेंतर्गत ग्राम रोजगार दिनाचे आयोजन चांदुर रेल्वे पंचायत समितींतर्गत येणाऱ्या तालुक्यातील धानोरा मोगल येथे ३० एप्रील रोजी करण्यात आले होते. या रोजगार दिनाच्या दिवशी नरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या हक्काविषयक व अनुषंगिक अनुज्ञेय लाभ देण्याची कार्यवाही करण्यात आली. या योजनेंतर्गत नोंदणीकृत मजुरांकरीता व इतर वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनाच्या पात्र लाभार्थ्यांकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धानोरा मोगलच्या संरपचा योगिता झार्केडे, सदस्य अमोल लायब्रर, सचिव राठोड, पटवारी पुसदकर, पंचायत समिती मग्रारोहयोचे स.का.अ. नेहा शर्मा, स्वराज्य मिञ मंडळ संस्थेचे अध्यक्ष राहुल बैस, बैस मॅडम तसेच धानोरा मोगल येथील रोजगार हमी योजनेचे महिला तथा पुरुष मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. असाच कार्यक्रम धानोरा म्हाली ग्रामपंचायत मध्येही राबविण्यात आला.
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -
चांदुर रेल्वेतील रेल्वे स्टेशन ते दिपोरी रेल्वे स्टेशन दरम्यान कि.मी. ६९५/१८ - २० जवळील डीएचआरडी च्या नालीमध्ये ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी एक पुरूष जातीचा अंदाजे ४५ वयोगटाचा, उंची ५ फुट २ इंच, रंग सावळा, अंगात पांढऱ्या रंगाचा चौकटीचा शर्ट (निळी चौकट), काळी बनियान, कथीया रंगाचा फुलपैंट, निळी निकर अशा वर्णनाचा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळुन आला. याची स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यु क्र. ४९/१६ कलम १७४ जा. फौ. अन्वये नोंद करण्यात आली आहे. सदर इसमाची ओळख अद्यापपावेतो पटली नसुन चांदुर रेल्वे पोलीस त्याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहे. तरीही वरील वर्णनाचा इसम हरविलेला असल्यास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन दुरध्वनी क्र. ०७२२२- २५४०३६ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.