पुणे -
पुणे महापालिकेच्या महापौर निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. महापौरपदासाठी येत्या १५ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे भारतीय जनता पक्षात मोर्चेबांधणीला वेग आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव भारतीय जनता पक्षाकडून निश्चित केले जाणार असून ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांनाच संधी दिली जाईल, अशी शक्यता पक्षात वर्तविण्यात येत आहे.‘‘विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १५ मार्च रोजी (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक शुक्रवारी (३ मार्च) जाहीर करण्यात येईल,’’ अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली.
पुणे –
गेली १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती, सनातन
संस्था आणि अन्य समविचारी संस्था यांच्या वतीने ‘खडकवासला जलाशय रक्षण
अभियान’ राबवण्यात येते. संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या
खडकवासला जलाशयामधील जलस्त्रोत प्रदूषित होऊ नये; म्हणून या अभियानाच्या
अंतर्गत धरणाच्या भोवती मानवी साखळी करून पाण्यात उतरू पहाणार्या
नागरिकांचे प्रबोधन केले जायचे. या उपक्रमाची आता प्रशासकीय स्तरावर नोंद
घेतली गेली असून जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांनी होळी आणि रंगपंचमी या
दिवशी रंग खेळून धरणात उतरण्यास नागरिकांना प्रतिबंध केला आहे. श्री. राव
यांनी पत्रकार परिषदेत तशी माहिती दिली. पोलीस, महापालिकेचे कर्मचारी,
स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक खडकवासला धरणाभोवती
मानवी साखळी करून थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्याच आठवड्यात सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक, हिंदु जनजागृती
समितीचे सर्वश्री दीपक आगवणे, महेश पाठक, कृष्णाजी पाटील यांनी
जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या उपक्रमाची सविस्तर माहिती
सांगून यामध्ये प्रशासनाचा सहभाग वाढावा, यासाठी निवेदन दिले होते, तसेच या
अभियानाचे संगणकीय सादरीकरण (पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन) केले होते. त्या वेळी
श्री. राव यांनी या उपक्रमाचे कौतुक करून ‘प्रशासनाचेही या उपक्रमाला
सहकार्य लाभेल’, असे आश्वासन दिले. त्यांनी तातडीने या उपक्रमाच्या
प्रसिद्धीचे, तसेच शासकीय कर्मचार्यांनी पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात
सहभागी सहभागी होण्याचे आदेश दिले. धर्माभिमानी सर्वश्री हणमंत आंबावडेकर,
सुधाकर संगनवार, सुरेंद्र कुमार हेही जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना
उपस्थित होते.
‘प्रशासनाने या उपक्रमाची नोंद घेऊन जलप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने
दिलेला आदेश आणि या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद
आहे’, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख यांनी
व्यक्त केली.
पुणे–
रासायनिक रंग लावून
खडकवासला धरणात खेळण्यासाठी येणार्या नागरिकांपासून जलाशयाचे रक्षण व्हावे
अर्थात् जलप्रदूषणाला आळा बसावा, या उद्देशाने गेली सलग १४ वर्षे हिंदु
जनजागृती समिती अन्य समविचारी संघटनांच्या समवेत ‘खडकवासला जलाशय रक्षण
अभियान’ राबवत आहे. यावर्षीही १३ मार्च (धूलिवंदन) आणि १७ मार्च (रंगपंचमी)
या दोन दिवशी खडकवासला धरणाच्या भोवती मानवी साखळी करून नागरिकांचे
प्रबोधन केले जाणार आहे. ‘कमिन्स इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाचे कर्मचारी,
अधिकारी, तसेच स्थानिक ग्रामस्थही या अभियानात सहभागी होणार आहेत. अधिकाधिक
जणांनी पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सहभागी व्हावे. त्यासाठी ८९८३३३५५१७
या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक
यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य
तागडे, ‘गार्गी सेवा फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय गावडे,
गोर्हे बुद्रुकचे सरपंच श्री. सचिन पासलकर हेही उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीनेही यंदाच्या वर्षी धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी
खडकवासला धरणात उतरण्यास नागरिकांना प्रतिबंध केला आहे. समिती, तसेच संस्था
यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे प्रशासनाने याची नोंद घेऊन पर्यावरण
रक्षणासाठी पुढाकार घेतल्याविषयी श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले.
श्री. तागडे यांनी उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
पुणे–
आजची काश्मीरसमस्या ही राजकीय नसून ही दोन धर्मांची लढाई आहे. गेल्या १ सहस्र वर्षांपासून धर्मांधांकडून हिंदूंवर प्रहार होत आहेत. गेल्या ७० वर्षांत हिंदूंना हिंदूंच्याच देशातून विस्थापित व्हावे लागत आहे. आज धर्मांध हे आमच्याच छाताडावर उभे राहून उघडउघड विरोध करत आहेत. त्यामुळे आपल्याला आपला काश्मीर मिळवण्यासाठी तेथून धर्मांधांना हाकलून लावून तेथे भगवा फडकवायचा आहे, असे परखड प्रतिपादन काश्मीर हिंदु सभेचे माजी अध्यक्ष श्री. रमेश शिवपुरी यांनी केले. ‘पनून कश्मीर’च्या वतीने १९ जानेवारी या दिवशी ‘काश्मिरी हिंदू विस्थापितदिना’च्या निमित्ताने धानोरी (जिल्हा पुणे) येथील काश्मीर भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी काश्मीर हिंदु सभेचे अध्यक्ष श्री. जगमोहन कौल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अमर मालमोही, काश्मीर वाहिनीच्या रितु सुंभली, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, तसेच अनेक काश्मिरी हिंदू उपस्थित होते.
श्री. रमेश शिवपुरी पुढे म्हणाले,
१. धर्मांधांनी हिंदूंना कमकुवत समजू नये. धर्मांधांशी हिंदू गेली १ सहस्र वर्षे लढूनही आज भारतात ८३ टक्के हिंदू आहेत. ही लढाई चालू रहाणार आहे.
२. आपल्यातील काही देशद्रोही ‘जयचंद’ हे आपल्याच देशाचे खाऊन आपल्याच देशाच्या विरोधात काही पैशांसाठी विकले गेले आहेत. अशा ‘आधुनिक जयचंद’ यांना देशातून हाकलले पाहिजे.
३. म. गांधी यांनी हिंदूंची जेवढी हानी केली, तेवढा अन्याय आणि हानी कोणी केली नाही. काश्मीरची समस्या निर्माण होण्यास जवाहरलाल नेहरू हे उत्तरदायी आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान असते, तर काश्मीरची समस्या राहिलीच नसती.
४. हिंदुस्थान हा देश हिंदूंचा होता, आता आहे आणि पुढेही रहाणारच !
पुणे–
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी होणार आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील खटल्यात आरोप निश्चिती करण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या १६ नोव्हेंबर २०१६ च्या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) मुंबई उच्च न्यायालयात ८ डिसेंबर २०१६ या दिवशी अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर उच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती ‘सीबीआय’ने केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ‘या अर्जावरील सुनावणी जानेवारी मासाच्या तिसर्या आठवड्यात होईल’, असे जिल्हा न्यायालयाला सांगण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्यामुळे १७ जानेवारी या दिवशी होणारी सुनावणी पुढे ढकलावी, असा अर्ज ‘सीबीआय’ने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सादर केला. ‘सीबीआय’च्या या अर्जावर सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अधिवक्त्या नीता धावडे यांनी उत्तर दिले की, ‘उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या खटल्यावर स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे खटला चालवण्यात यावा.’ त्यावर जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी ठेवली असल्याचे सांगितले.
पुणे –
भारतीय संस्कृतीमध्ये वेदाध्ययनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद नवीन पिढीला समजावणे आणि आपली संस्कृती अबाधित राखणे, याचे कार्य वेदपाठशाळा करतात. भारतभरामध्ये अनुमाने ३०० वेदपाठशाळा असून त्या सर्वांना मिळून शासन वर्षाकाठी ८ कोटी रुपये अनुदान देते. एकूणच वेदपाठशाळांना शासनाकडून मदरशांइतके अनुदान मिळत नसल्याची खंत येथील वेदभवनचे प्रधान आचार्य वेदाचार्य मोरेश्वर घैसासगुरुजी यांनी व्यक्त केली.
वेदाचार्य घैसासगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे ही परिस्थिती असतांना वेदपाठशाळेतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या मुलांना शुद्ध मंत्र उच्चारता येत नाही. यासाठी वैदिकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. तसेच जे कोणी १५ वर्षे अभ्यास करून त्या विषयांत पारंगत होतात, त्यांना अध्यापनाची संधी न मिळाल्याने त्यांना समाजात पौरोहित्य करण्यावाचून पर्याय रहात नाही. त्यामुळे आज वेदज्ञान पौरोहित्यात अडकून पडले आहे. वेदशास्त्राचे एखादे विद्यापीठ असावे, यासाठी माझ्या वडिलांनी सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार केला; पण त्याचा फारसा उपयोग न झाल्याने आम्ही प्रयत्न सोडून दिले.’’
पुणे –

सनबर्न फेस्टिव्हल ज्या केसनंद गावामध्ये होत आहे, ते ठिकाण धर्मवीर संभाजी महाराज यांचे समाधीस्थान, वारकर्यांचे तीर्थक्षेत्र आळंदी, तसेच अष्टविनायकांपैकी थेऊरच्या श्रीगणेशाचे तीर्थक्षेत्र आदी पवित्र क्षेत्रांनी वेढलेले आहे. या क्षेत्राच्या पावित्र्याची भावना लक्षात घेऊन केसनंद ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट २००७ मध्ये ग्रामसभेत दारूबंदीचा प्रस्ताव पारित केला. त्याच गावात मद्य, तसेच अमली पदार्थ यांच्या मुक्त सेवनाचा पूर्वेतिहास असणार्या सनबर्न फेस्टिव्हलचे सरकार समर्थन करत आहे. अशा प्रकारे गावातील दारूबंदीचा ठराव मोडू देऊन त्या परिसराचे पावित्र्य भंग करण्याचा सरकारला काय अधिकार आहे ? असा प्रश्न उपस्थित करत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला. २८ डिसेंबर या दिवशी येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी श्री. निखिल मेदनकर, अधिवक्ता नीलेश निढाळकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक, अधिवक्ता मोहनराव डोंगरे, हवेली तालुका डीजे चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष श्री. गणेश काळभोर आणि सौ. शुभांगी आफळे हे उपस्थित होते.
संस्कृतीविरोधी आणि कायदे-नियम पायदळी तुडवणार्या सनबर्न फेस्टिव्हलला वैध मार्गाने विरोध करणार्यांवरच कारवाईचा दंडुका उगारण्याच्या पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्या भूमिकेच्या संदर्भात श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित केलेली सूत्रे…
१. कार्यक्रमाच्या आयोजकांकडे काही अनुमत्या मिळणे प्रलंबित असतांनाही सरकारही हा कार्यक्रम पार पाडण्याच्या भूमिकेत आहे. हे म्हणजे कार्यक्रमाला अनधिकृत अनुमती देण्यासारखे आहे.
२. त्या ठिकाणी २५ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो, असे म्हटले आहे; मात्र विद्यार्थ्यांची किमान वयोमर्यादा नमूद करण्यात आलेली नाही. या संदर्भात पेटीएम्द्वारे तिकिटे खरेदी करणार्या अनेक जणांनी त्यांना पैसे देऊनही तिकिटे न मिळाल्याने सनबर्न म्हणजे चोरांची टोळी आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
३. सरकार एकीकडे व्यसनाधीनता दूर करण्याचे सांगते, तर दुसरीकडे व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणार्या कार्यक्रमांना समर्थन देत आहे.
४. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ, तसेच पत्रकार यांवर दमदाटी करणार्या बाऊन्सर्सच्या विरोधात कारवाई केली जात नाही; मात्र वैध मार्गाने विरोध करणार्या ग्रामस्थांना कलम १४९ च्या नोटिसा दिल्या जात आहेत. कायदा मोडणार्यांना मोकळीक; मात्र कायदा पाळणार्यांवर कारवाई असेच चित्र आहे. सरकारला महाराष्ट्राला नेमके कुठे नेऊन ठेवायचे आहे ?
 |
| सनबर्नविरोधी बैठकीत उपस्थित शिवसैनिक |
पुणे- धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमी कटिबद्ध आहे. सनबर्न फेस्टिव्हल भारतीय युवकांना व्यसनाधीन बनवणारा आहे. हा फेस्टिव्हल आम्ही कदापि होऊ देणार नाही. हा फेस्टिव्हल होत असेल, तर शिवसेना पद्धतीने हा कार्यक्रम बंद पाडू, अशी खणखणीत चेतावणी शिवसैनिकांनी दिली आहे. सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात २० डिसेंबर या दिवशी लोणीकंद येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्या वेळी हा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा फेस्टिव्हल महाराष्ट्रातच नाही, तर भारतात अन्यत्र कुठेही होऊ देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप अप्पा भोंडवे यांनी दिली. या प्रसंगी ७३ शिवसैनिक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे, श्री. पराग गोखले उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांसमवेत स्थानिक ग्रामस्थ, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांची २५ डिसेंबर या दिवशी खुली चर्चा आयोजित करावी. कार्यक्रमाच्या अनुमतीपत्राविषयी याप्रसंगी चर्चा ठेवावी अन्यथा २६ डिसेंबर या दिवशी शिवसेना त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल, असे श्री. संदीप अप्पा भोंडवे यांनी सांगितले.
http://sunburn.in/
#sunburnfestival
 |
| दारूबंदीसाठी आंदोलन करतांना महिला |
पुणे - ‘दारूबंदी’च्या अभियानांतर्गत हिंदु राष्ट्र सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अलीकडेच राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या समोर आंदोलन केले. ‘दारूबंदी झालीच पाहिजे’ अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. हिंदु राष्ट्र सेनेच्या महिला आघाडीच्या सौ. तृप्ती काळे आणि श्री. वैजनाथ भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
हिंदु संस्कृतीवरील आघातांच्या विरोधात संघटित होणार्या हिंदूंचे अभिनंदन !
पुणे - २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत केसनंद (वाघोली, जिल्हा पुणे) येथे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पहाता यंदाच्या वर्षी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सर्वच स्तरांतून वाढता विरोध होतांना दिसून येत आहे. ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून व्यसनाधीनतेला चालना मिळत असून हा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक राजधानी म्हणवणार्या पुणे शहराला कलंकच आहे. त्यामुळेच स्थानिक नागरिकांपासून विविध हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना या महोत्सवाच्या विरोधात कृतीशील होत आहेत. हिंदु संस्कृती भ्रष्ट करणारा आणि भारतीय युवकांना पाश्चात्त्य संगीताच्या नावाखाली व्यसनाधीनतेकडे नेऊ पहाणारा हा महोत्सव रहित व्हावा, या मागणीसाठी १७ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
ह.भ.प. मंचक महाराज कराळे (परभणीकर) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्री कसबा गणपति मंदिरापासून मोर्च्याला प्रारंभ झाला. या वेळी ‘सनबर्न’ कार्यक्रमाच्या विरोधात उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या, तसेच या कार्यक्रमाच्या विरोधात समस्त नागरिकांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठीकाणी मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. यानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेश मुठे यांना निवेदन देऊन हा कार्यक्रम रहित करण्याची मागणी केली. पंचायत समितीचे सदस्य संतोष भाडळे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. मुकुंद म्हासाळ, भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. गायत्री काळभोर, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अधिवक्ता गणेश म्हस्के आदी मान्यवरांसह २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू या मोर्च्यात सहभागी झाले होते. फेसबूकच्या माध्यमातून मोर्च्याचे ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करण्यात आले होते.
|
डावीकडून श्री. चंद्रकांत वारघडे, अधिवक्ता श्री. मोहनराव डोंगरे, सर्वश्री पराग गोखले, चैतन्य तागडे आणि आनंद दवे |
हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषदेद्वारे मागणी
पुणे,- अमली पदार्थांचा अपवापर आणि अनैतिक कृत्ये यांमुळे कुप्रसिद्ध ठरलेला आणि गोव्यातून हाकलण्यात आलेला सनबर्न फेस्टिव्हल सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात होत आहे. गोवा शासनाने या फेस्टिव्हलच्या आयोजकांना ३ कोटी रुपयांचा थकवलेला कर भरण्याचा आदेश दिला आहे. असा हा फेस्टिव्हल पुण्यात झाल्यावर आयोजक महाराष्ट्र शासनाचा कर जमा करतील का, याची निश्चिती न करताच शासकीय अधिकार्यांनी या फेस्टिव्हलला अनुमती दिली आहे.
केसनंद गावात ग्रामदेवतेच्या मंदिराजवळच या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे या महोत्सवाला स्थानिकांचा विरोध आहेच, तसेच तेथील भक्तांचाही याला विरोध आहे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी फेस्टिव्हलला जाहीरपणे विरोध केला आहे. एकीकडे व्यसनाधीनतेमुळे तरुण मुलांचे मृत्यू होत असतांना तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे वळवणारा आणि संस्कृती भ्रष्ट करणारा हा सनबर्न फेस्टिव्हल रहित झालाच पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पुणे समन्वयक श्री. पराग गोखले यांनी केली. १६ डिसेंबर या दिवशी पुणे येथील पत्रकार भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, प्रखर हिंदुत्ववादी अधिवक्ता श्री. मोहनराव डोंगरे, हिंदुत्वनिष्ठ आणि अभ्यासक, तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे अतुल पोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे उपस्थित होते.
श्री. पराग गोखले पुढे म्हणाले, फेस्टिव्हलच्या रंगभूमीवर नटराजाची प्रतिकृती ठेवली जाते. तिच्यासमोर सर्वजण अंगविक्षेप करत नाचतात. नटराज म्हणजे शिवाचे रूप असून असे करणे म्हणजे त्याचा अवमानच आहे. स्थानिक गावकर्यांचाही या कार्यक्रमाला विरोध आहे. वाघोली येथे या संदर्भात १५ डिसेंबरला घेण्यात आलेल्या बैठकीत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी एकमुखाने हा कार्यक्रम होऊ देणार नाही, असे सांगितले आहे.
 |
| आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू |
पुणे- विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे शहरात केसनंद येथे २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ घातला आहे. पाश्चात्य संगीताच्या नावाखाली युवा पिढीला व्यसनाधिनतेकडे नेणारा महोत्सव पुण्यातून हद्दपार करणारच, अशी खणखणीत चेतावणी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात देण्यात आली. १२ डिसेंबर या दिवशी मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे करण्यात आलेल्या या आंदोलनाला १७५ हून अधिक धर्माभिमानी महिला उपस्थित होत्या.
२०१३ मध्ये गोव्यात झालेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये ‘अमली पदार्थविरोधी पथका’ला शेकडो जण सार्वजनिकरित्या हुक्का आणि चिलीम पित असतांना आणि अनेक जण तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहात अमली पदार्थांचे सेवन करत असतांना पहायला मिळाले. या फेस्टिव्हलच्या आयोजकांनी ‘हा ‘ड्रग्ज-फ्री इव्हेंट’ (अमली पदार्थमुक्त कार्यक्रम) आहे, असे कितीही सांगितले’, तरी या ठिकाणी अमली पदार्थांच्या सेवनाचा मुक्त संचार असतो, हा पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथक यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे. पुण्याचा सांस्कृतिक इतिहास लक्षात घेता ‘सनबर्न’सारखे महोत्सव पुण्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावणारे आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली समाजाच्या अनेक स्तरांतून महोत्सवाला विरोध होत असल्याचे चित्र आहे. या व्यतिरिक्त ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी आणि ‘हिंदूंनी नववर्ष १ जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्याला साजरे करावे’, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
पाश्चिमात्त्य संस्कृतीला देशात थारा देणार नाही !
- सौ. सरिता अंबिके, दुर्गावाहिनी आणि मातृशक्ती संयोजिका
विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गा वाहिनीच्या सौ. सरिता अंबिके म्हणाल्या, ‘‘पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमणाला स्थानिक पातळीपासून विरोध होत आहे. आपल्या हिंदु संस्कृतीत सांगितलेली मूल्ये जपली पाहिजेत. युवा पिढीला वाममार्गाला नेणार्या अशा फेस्टिव्हलला जाण्याऐवजी नागरिकांनी हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणून घेऊन त्याचे पालन आणि जतन करायला हवे. ३१ डिसेंबरच्या दिवशी नवीन वर्ष साजरे करणे, हे आमच्या संस्कृतीतच नाही. त्यामुळे अशा अनावश्यक गोष्टींना वेळ देण्यापेक्षा धर्मशास्त्राचे महत्त्व जाणून घेऊन सेवा हेच यज्ञकर्म मानून कर्म केले पाहिजे. भारत देशात पसरू पहाणार्या पश्चिमात्त्य संस्कृतीला देशात अजिबात थारा मिळू देणार नाही.’’
लोकमान्य टिळकांच्या क्रांतीच्या प्रेरणेने आंदोलन यशस्वी होईलच !
- सौ. जयश्री देशपांडे, सचिव, नारद मंदिर
लोकमान्य टिळक, चापेकर बंधू अशा क्रांतिकारकांच्या, तसेच तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यनगरी कालांतराने पुणे अशी ओळखली जाऊ लागली. संस्कृतीचे आणि विद्येचे माहेरघर असलेल्या या शहरात गोवा राज्याने नाकारलेल्या सनबर्नसारख्या फेस्टिव्हलचे आयोजन पुण्याने स्वीकारले, याचा मी पूर्णपणे निषेध करते. प्रत्येक घरातील महिलेने याचा निषेध केला पाहिजे. ३१ डिसेंबरच्या दिवशी रात्रभर होणार्या धिंगाण्याला न थांबवता हिंदूंच्या सणांना मात्र नेहमीच पायबंद घातले जातात, ही सर्वांत खेदजनक आणि निषेधार्ह अशी गोष्ट आहे. या सर्व घटनांचा विरोध करण्यासाठीच हे आंदोलन आज करण्यात येत आहे. लोकमान्य टिळकांच्या क्रांतीच्या प्रेरणेने हे आंदोलन नक्की यशस्वी होईल. ‘
सनबर्न’ रहित होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील !
- कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा
वर्ष २००९ मध्ये गोव्यात झालेल्या या फेस्टिवलमध्ये नेहा बहुगुणा या अवघ्या २३ वर्षीय तरुणीचा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. २०१३ मध्ये गोव्यातील वागोतर बीचवर झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्जविक्रेत्याला चरससहित अटक केली होती. धूम्रपान करणार्यांची संख्या तेथे पुष्कळ होती. असा हा फेस्टिव्हल पुण्यातून जोपर्यंत रहित होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. महिलांवर होणार्या अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी प्रत्येक महिलेमधील दुर्गादेवीचे तत्त्व जागृत व्हायला हवे. अशा जागृत झालेल्या रणरागिणीच पुढे हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये योगदान देतील.
रणरागिणीच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा !
- सौ. सुनीता खंडाळकर, शिवसेना
खडकवासला मतदार संघातील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख सौ. सुनीता खंडाळकर यांनीही ‘सनबर्न आणि ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार यांविरोधात रणरागिणी शाखेने छेडलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे’, असे सांगितले. सनातन संस्थेच्या वतीने कु. शलाका सहस्रबुद्धे यांनीही गौरवशाली हिंदु संस्कृतीतील विश्वाच्या कानाकोपर्यात पोचवण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले.
आंदोलनात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सर्वश्री बाळकृष्ण वांजळे, शिवसेनेचे ग्राहक संरक्षण उपकक्षप्रमुख निखिल जावळकर, ह.भ.प. मंचक महाराज कराळे परभणीकर, कोथरूड विभागातील भाजपच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ. गायत्री काळभोर सहभागी झाले होते.
शरद यादव असे वक्तव्य अन्य
धर्मियांविषयी करू धजावतील का ?
पुणे- भारतात एवढ्या देवी-देवता आहेत, की त्या मोजताही येत नाहीत. काही लोकांनी देवतांनाही जाती-जातींमध्ये विभागले आहे. भारतातील ३३ कोटी देवता भंंगारासारख्या फेकून देण्यायोग्य आहेत, असे हिंदुद्वेषी वक्तव्य जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी केले. (हिंदूंच्या धर्मभावना जाणीवपूर्वक दुखावणारे शरद यादव यांच्यासारख्यांचे हिंदुद्वेषाचे जाहीर उमाळे रोखायचे असतील, तर हिंदूंचे प्रभावी आणि कृतीशील संघटन आवश्यक ! - संपादक) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने २८ नोव्हेंबर या दिवशी जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विधानभवनाचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते यादव यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे, डॉ. बाबा आढाव, पंकज भुजबळ, आमदार कपिल पाटील, माजी आमदार दीप्ती चौधरी आदी उपस्थित होते.
शरद यादव
यांनी उधळलेली मुक्ताफळे
१. इथे कोणालाही देव मानले जाते. मग फुले आणि आंबेडकर यांचाही त्यात समावेश केला, तर काय फरक पडतो ? (एकीकडे देवतांना भंगारात टाकण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे फुले आणि आंबेडकर यांना देव बनवा, असे सांगायचे ! हा फुले आणि आंबेडकर अनुयायांना अप्रत्यक्ष लावलेला टोला समजायचा का ? - संपादक)
२. भारतात आर्थिक विषमतेबरोबर जात, लिंग, पंथ या प्रकारेही विषमता जपली जाते. समाजातील काही लोक स्वत:ला संस्कृतीचे रक्षक समजून विषमतेत वाढ करत आहेत. (विषमता आणि विविधता हे निसर्गाचेच वैशिष्ट्य आहे. शरद यादव यांच्यासारख्या व्यक्ती मात्र या विविधतेचा अपलाभ घेऊन समाजात यादवी निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. - संपादक)
३. आंबेडकरांनी शोषितांसाठी आरक्षण लागू केले होते; मात्र आता प्रत्येक जात आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी मोर्चे काढत आहे. दलितांना मिळालेला एक तुकडाही हिरावून घेण्याचा हा प्रयत्न चालू आहे. (डॉ. आंबेडकर यांनी वस्तूतः १० वर्षांनंतर आरक्षण रहित करण्याविषयी सूचित केले होते. मग शरद यादव डॉ. आंबेडकर यांच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न करणार का ? - संपादक)
४. या वेळी रामराजे निंबाळकर म्हणाले की, महात्मा फुले यांच्या विचारांना त्याग आणि सहिष्णुतेची झालर नसेल तर नव्या पिढीपर्यंत ते विचार योग्य रीतीने पोचतील, याविषयी शंका वाटते.
साभार -दैनिक सनातन प्रभात संकेतस्थळ
अंनिसवर कारवाई व्हावी यासाठी पुण्यातील भाजप आमदारांचा सकारात्मक प्रतिसाद
 |
प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी (उजवीकडे) यांना विषय समजावून सांगतांना श्री. प्रवीण नाईक |
पुणे - नागपूर येथे येत्या हिवाळी अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून त्यांच्यावर बंदी आणावी, या मागणीसाठी मी लक्षवेधी सूचना मांडून प्रयत्न करेन, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड येथील भाजप आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी आणि अन्य कार्यकर्त्यांनी यांनी श्री. जगताप यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अंनिसमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी सादर केलेला अहवाल यांविषयीची माहिती दिली.
अंनिसची चौकशी करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या मुख्य सचिवांशी चर्चा करणार !
- आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी
अंनिसकडून होत असलेले आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण गंभीर असून त्यांची चौकशी व्हावी, यासाठी मी विधी आणि न्याय विभागाच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून तसे प्रयत्न करेन, असे प्रतिपादन भाजप आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रवीण नाईक आणि अन्य कार्यकर्त्यांनी सौ. कुलकर्णी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढतांना त्या म्हणाल्या, माझा सनातन संस्थेला सदैव पाठिंबा असून माझी सनातनवर श्रद्धा आहे.
क्षणचित्र
या वेळी प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या स्वीय सचिवांना विधी आणि न्याय विभागाच्या मुख्य सचिवांची वेळ घेऊन ठेवण्यास सांगितले.
पुणे-
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर आणि श्याम मानव यांच्याशी श्रद्धा अन् अंधश्रद्धा यांविषयी अनेक वेळा चर्चा करूनही कोणताही लाभ नाही; परंतु ते लोक ऐकणारे नाहीत. ते धर्माची हानी करतात. त्यामुळे अंनिसवर बंदी घालायला हवी, असे मत आळंदी येथील ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि अन्य कार्यकर्ते यांनी ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांची त्यांच्या आश्रमात भेट घेतली. या वेळी त्यांना श्रीक्षेत्र आळंदी येथे २६ नोव्हेंबर या दिवशी होणार्या १२ व्या वारकरी महाअधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
ह.भ.प. किसनमहाराज साखरे पुढे म्हणाले, धर्मावर आघात होत असतांना आपण शांत राहून चालणार नाही. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आज प्रत्येकाला आवश्यकता आहे. तुमच्या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत.
मुसलमानांसाठी इस्लामी अधिकोष चालू करण्याच्या प्रस्तावावरची प्रतिक्रिया !
पुणे - मुसलमानांसाठी शरियतच्या नियमांनुसार
व्याजाची संकल्पना नसलेला इस्लामी अधिकोष चालू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह
बँकेच्या वतीने केंद्र सरकारकडे मांडण्यात आला. या प्रकाराची 'समान नागरी
कायद्याच्या विरुद्ध दिशेने चाललेला प्रवास' अशी निर्भत्सना करत अखिल
भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी
'मुसलमानांसाठी उद्या नव्या नोटाही काढणार का', असा उपरोधिक प्रश्न
उपस्थित केला.
या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करतांना त्यांनी सांगितलेली
सूत्रे
१. सरकारला बिनव्याजी कर्ज द्यायचेच असेल, तर गरीब, शेतकरी, मजूर अशा
सर्वांनाच द्यावे. धर्माच्या आधारावर कशासाठी ? हा निवळ मूर्खपणा आहे.
२. आजपर्यंत कोणत्याही मुसलमान नेत्याने ही मागणी केली नाही.
३. असा निर्णय घेऊन मुसलमानांना मुख्य प्रवाहातून बाहेर काढले जात आहे.
४. मुसलमानांसाठी वेगळे अधिकोष काढायचे आणि शरियतच्या कायद्यानुसार
बिनव्याजी कर्ज द्यायचे, असे घाट मोदी सरकार घालत असेल, तर त्याला सर्वांनी
प्रखर विरोध करायला हवा.
५. 'अधिकोषांमध्ये सर्व मुसलमानांचा समावेश झाला पाहिजे', या अट्टाहासापायी
मुसलमानांच्या सोयीसाठी केले जाणारे वाटेल ते प्रयत्न खपवून घेता कामा
नये.
हिंदु युवतींनो, लव्ह जिहादच्या षड्यंत्रापासून रक्षण होण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही, हे जाणा !
अॅसिड फेकण्याची धमकी
सिगारेटचे चटके देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण
पोलिसांकडून तक्रार प्रविष्ट करून घेण्यास प्रारंभी टाळाटाळ
पुणे- - कोंढवा येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या सनी अमनुल्ला मन्सुरी (वय २३ वर्षे) याच्याकडून एका २३ वर्षीय हिंदु युवतीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तो या हिंदु युवतीवर लग्नासाठी बळजोरी करत असे, तसेच रस्त्यात गाठून तिला मारहाणही करत असे. युवतीने सनी याला लग्नासाठी स्पष्ट शब्दांत नकार देऊनही त्याच्याकडून युवतीचा अघोरी छळ होत होता. विशेष म्हणजे या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास जाऊनही पोलिसांनी युवतीची नोंद घेतली नाही. त्यानंतर पोलीस आयुक्तांना केलेल्या तक्रारीत युवतीने वरीलप्रकारे तिच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी, तसेच झालेल्या मानसिक छळाविषयी अवगत केले. त्यानंतर या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सनी याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे.
१. सदर युवतीच्या आई-वडिलांचे निधन झाले असून ती गंजपेठेत एकटीच रहाते. तिचा भाऊ बेंगळुरू येथे असतो. युवतीच्या एकटेपणाचा अपलाभ घेऊन सनी याने युवतीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची फसवणूक केली
२. सनी मन्सुरी हा व्यसनी असल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने त्याच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. १३ नोव्हेंबर या दिवशी त्याने युवतीच्या कार्यालयातून तिला बळजोरीने नेऊन रविवार पेठ, रामोशी गेट, तसेच कोंढवा मॉल येथे भर रस्त्यात मारझोड केली.
३. एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. युवतीने प्रतिकार करतांच तिचे डोळे, छाती आणि हात या ठिकाणी सिगारेटचे चटके दिले.
तिने त्याच्या समवेत येण्यासाठी तुझ्या भावाला मारून टाकीन, तोंडवळ्यावर अॅसिड फेकीन, अशी धमकीही दिली. (अशा धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! - संपादक)
४. या प्रकरणी हिंदु युवतीला धीर देत तक्रार नोंदवण्यासाठी समस्त हिंदू आघाडी, तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकर्त्यांनी साहाय्य केले.
कात्रज (पुणे) येथील संत खेतेश्वर आश्रम येथे दुमदुमली हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !

पुणे - भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले. काश्मीरप्रमाणे येथील परिस्थिती होऊ नये आणि समाजविघातक गोष्टींना विरोध करणे, यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तसे सर्व हिंदूंनी संघटित होऊन २०२३ मध्ये आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त येथील कात्रज भागातील संत खेतेश्वर आश्रम येथे १४ नोव्हेंबर या दिवशी अखिल राजस्थानी समाज संघ यांच्या वतीने पुरुषांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी अखिल राजस्थानी समाज संघाचे महासचिव श्री. मोहनसिंह राजपुरोहित, खजिनदार श्री. गणेश डांगी, पूर्वअध्यक्ष श्री. बाबू सिंह मादा, देवासी समाजाचे अध्यक्ष श्री. मोलारामजी देवासी, राजपुरोहित समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. जयसिंह राजपुरोहित आणि अन्य मान्यवर यांच्यासह २०० हून अधिक धर्माभिमानी पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गजानन केसकर यांनी केले.
आपल्या मुलींना राणी पद्मिनीचा आदर्श घेण्यास शिकवा ! - कु. मोनिका गावडे
‘सध्याच्या अभिनेत्रींचे शील भ्रष्ट झालेले आहे. त्यामुळे आजच्या तरुणींनी इंग्रजांविरुद्ध लढा देणार्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि शीलरक्षणासाठी जोहार करणार्या राणी पद्मिनी यांचा आदर्श घ्यायला हवा. तसेच आपली मुलगी योग्य दिशेने वाटचाल करत आहे ना, याकडे लक्ष द्यायला हवे. आपल्या मुलींना कोणत्या दिशेने न्यायचे, हे मातांनी ठरवले पाहिजे. आजच्या तरुणींनी धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’ सारख्या युक्त्यांना बळी न पडता स्वतः धर्माचे शिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. संकटकाळी केवळ देवच आपल्या साहाय्यासाठी येणार असल्याने नियमित कुलदेवतेची उपासना करा’, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. मोनिका गावडे यांनी केले. अखिल राजस्थानी समाज संघ यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करत होत्या. या वेळी १२५ महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. क्रांती पेटकर यांनी केले.
न्यायालयालाही न जुमानणार्या अन्वेषण यंत्रणा !
पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला
पुणे - डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी आरोप निश्चिती करण्याची सुनावणी बंदुकीच्या गोळ्यांचा अहवाल स्कॉटलंड यार्डहून येईपर्यंत पुढे ढकलावी, असा विनंतीअर्ज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे (सीबीआयचे) अतिरिक्त शासकीय अधिवक्ता मनोज चलाडे यांनी न्यायालयात सादर केला. त्यावर संशयित म्हणून अटकेत असलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय्. लाडेकर यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला फटकारत सुनावले की, ‘तुम्हाला उच्च न्यायालयाने ६ आठवड्यांची मुदत दिली होती. आता ती संपली आहे. असे असतांना तुम्हाला आणखी मुदत हवी कशाला ? त्या कालावधीत काय केले ?’, अशा शब्दांत खडसवत न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेचा अर्ज फेटाळून लावला. तसेच अन्वेषण यंत्रणेला एक संधी म्हणून २८ नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी १६ नोव्हेंबर या दिवशी झाली. या वेळी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी एस्.आर्. सिंह उपस्थित होते. या पूर्वी २१ ऑक्टोबरला झालेल्या पूर्वसुनावणीच्या वेळी न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेला गंभीर शब्दांत ‘पुढील सुनावणी ४ नोव्हेंबरला चालू करायचीच आहे आणि आतापर्यंत अनेक वेळा मुदत दिलेली आहे. हा खटला कायद्यानुसार चालवावा’, असे सुनावले होते; परंतु ४ नोव्हेंबरलाही पुढील तारीख पडली होती.
या वेळी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेला युक्तिवाद
१. उच्च न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेला या प्रकरणातील पुरावे म्हणून असलेल्या बंदुकीच्या गोळ्या स्कॉटलंड यार्डला पाठवण्याविषयी अनेक वेळा सांगितले आहे. आतापर्यंत यंत्रणेने त्या गोळ्या पाठवलेल्या नाहीत.
२. यंत्रणेने आरोपपत्र प्रविष्ट केले, त्या वेळीही अन्वेषण यंत्रणेला बंदुकीच्या गोळ्या पाठवायच्या आहेत, हे माहिती होते. असे असतांना न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट कसे केले ? आरोपीला जामीन मिळू नये; म्हणून आरोपपत्र प्रविष्ट केले आणि आता खटला लांबवत आहेत.
३. बंदुकीच्या गोळ्यांचा येणारा अहवाल हा केव्हा येईल, हे अद्याप ठाऊक नाही. हा अहवाल यायला ३ मास, ३ वर्षे असा कितीही कालावधी लागू शकतो. असे असतांना तोपर्यंत हा खटला लांबवणे कितपत योग्य आहे ?
४. स्कॉटलंड यार्डकडून येणार्या अहवालातून ‘त्या बंदुकीच्या गोळ्यांचा डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांशी काही संबंध आहे का’, हे कळणार आहे. त्याचा या प्रकरणाशी काहीएक संबंध नाही. आतापर्यंत त्या गोळ्या पाठवलेल्या नसल्याने अन्वेषण यंत्रणेचा एकूण न्यायालयीन प्रक्रिया थांबवण्याचा आणि वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
५. अन्वेषण यंत्रणेने केलेल्या विनंतीअर्जाला आमचा आक्षेप असून यंत्रणेने गोळ्यांचा पुरावा न्यायालयात सादर करावा आणि आरोपनिश्चिती करावी.
६. आरोपीला खटला जलद चालवण्याची मागणी करण्याचा संवैधानिक अधिकार आहे.
साभार - दैनिक सनातन प्रभात
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांचे अभ्यासहीन वक्तव्य !
हिंदूंनी देवस्थानांत श्रद्धेने अर्पण केलेला पैसा हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी,
तसेच अन्य धार्मिक कार्यांसाठीच वापरला जायला हवा ! हिंदूंना धर्मशिक्षणच
नसल्यामुळे हा धर्मद्रोह आहे, हेही त्यांच्या लक्षात येत नाही !
पुणे - तिरुपती बालाजी मंदिर देवस्थानचा पैसा एका विश्वविद्यालयाला दिला जातो. त्याप्रमाणे शिर्डी आणि पंढरपूर देवस्थान यांना मिळणारा पैसा अशाच पद्धतीने विद्यापिठांकडे वळवला, तर एकाही विद्यापिठाला शासकीय अनुदानाची आवश्यकता भासणार नाही, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी केले. (विद्यापिठांना पैसे उभारण्यासाठी अन्य अनेक मार्ग उपलब्ध असतांना त्याकडे दुर्लक्ष करून हिंदूंच्या मंदिरांच्या संपत्तीवर डोळा ठेवण्याची सध्या टूमच आली आहे ! - संपादक) अंजली पब्लिकेशन हाऊसच्या वतीने गझलकार दीपक करंदीकर लिखित अभिनव श्री व्यंकटेश माहात्म्य या ओवीबद्ध पोथीचे प्रकाशन डॉ. कामत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संत साहित्याचे अभ्यासक वा.ल. मंजुळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाशक आनंद साने हेही उपस्थित होते.
साभार - दैनिक सनातन प्रभात संकेतस्थळ