महाराष्ट्र राज्य औद्योगीक समुह विकास कार्यक्रमअंतर्गत सोलर चरख्यापासुन सुत तयार करणाऱ्या समुहाच्या क्षमतावृध्दीसाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी किरण गित्ते, अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेक, माविम जिल्हा व्यवस्थापक खुशाल राठोड, डॉ.पी.बी काळे संचालक महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था वर्धा, प्रा.डॉ.निशा शेंडे, ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे उपस्थित होते.
राज्यातील मंत्रालयात व काही जिल्ह्यामध्ये स्टॉल लावण्यात आले आहे.पुण्यातील यशदा व पंचतारांकीत हॉटेल्समध्येही या बचतगटाव्दारे निर्मीत चादरी, टॉवेल्स, शर्ट्स पॅन्टस, जाकीट पुरवण्यात येत असल्याची माहिती प्रास्ताविकातुन प्रदीप चेचरे यांनी दिली.
महीलांनी चरख्याच्या माध्यमातुन स्वावलंबी व्हावे. जिल्ह्यातील वस्त्रोद्योग उद्यानाला देखील या बचतगटांच्या महीलांनी तयार केलेले धागे पुरवता येतील का याबाबतीतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले. लोकांनी कृत्रीम धाग्यापासुन बनविलेल्या वस्त्र परिधान करण्यापेक्षा खादीकडे वळण्यासाठी शासनाने शासकीय कार्यालयात खादी वापरण्याविषयी परिपत्रक काढले आहे. जिल्ह्यातील सोलर चरखा युनिटच्या ग्रामोद्योग कार्यालयाचे कामाविषयी पालकमंत्रयानी समाधान व्यक्त केले.
सोलर चरख्याचा उगम वर्धा जिल्ह्यातुन असुन संपुर्ण राज्यभरात सोलर चरख्याचे काम फक्त अमरावती जिल्ह्यातच सुरू असल्याचे किरण गित्ते यांनी सांगीतले. सोलापुर जिल्ह्यातील विडी उत्पादक 50 हजार महीला कामगारांनीही अश्या पध्दतीचे काम करण्याची मागणी केली.130 सोलर चरख्याव्दारे काम करणाऱ्या महीलांच्या कामाल स्थैर्य मिळावे. कस्तुरबा सोलर खादी महिला समितीव्दारे वस्त्रोद्योगाला रूई,सुत पुरविण्यावर भर देण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासन या बचतगटांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगीतले. तालुकास्तरावर शासनाव्दारे स्वयंम प्रकल्प सुरू होत असल्याचे ही त्यांनी सांगीतले. यावेळी या बचतगटाव्दारे निर्मीत खादीचे जॅाकेट मान्यवरांना भेट देण्यात आले.
या बचतगटांना सोलर चरख्याप्रमाणेच शासनाकडून सोलर लुम वाटप करावे यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे पालकमंत्र्याना घातले. बांबु व टेराकोटाचे प्रशिक्षणही महीला बचतगटांना देण्यात यावे याकडे डॉ.पी.बी काळे संचालक महात्मा गांधी ग्रामीण औदयोगीकरण संस्था वर्धा यांनी लक्ष वेधले.
स्त्री अभ्यासक निशा शेंडे यांनी बचतगट हे सामाजिक सक्षमीकरणचे उदाहरण असल्याचे मत मांडले. या प्रकल्पातुन ग्रामीण स्त्रीयांना स्व:तमधील क्षमतांचा परीचय होत असल्याचे सांगीतले. यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते कस्तुरबा सोलर खादी महीला समीतीच्या माहीतीपुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या करुणा पाराशर, पदमा वंजारी, नंदा गणवीर, चित्रा पाटील, सरोज दंतोले यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनाही सन्मानित करण्यात आले.
Post a Comment